Monday, 8 January 2018

Poem on relationship

नाती स्पेशल !! सुख ओरबडण्याच्या शर्यतीत सामील होऊ नका आपलं काही चुकतंय का ? थोडं तपासून तर बघा प्रेम , त्याग , सहनशीलता ठेवावीच लागेल आपल्या माणसाशी नातं तोडून कसं काय भागेल ? कौतुक करणारं असेल तर मोठं होण्याला अर्थ असतो लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा माणूस का उदास दिसतो ? सुबत्तेच्या विळख्या मधे खरंच सापडू नका आपलं काही चुकतंय का ? थोडं तपासून तर बघा जगाशी मैत्री करतांना मूळं का उपटावीत दूरचे जवळ घेतांना सख्खे दूर का लोटावीत ? पाणी आणि मृगजळ यातला फरक लक्षात घ्या नातं तोडणाऱ्या अहंकाराला तिलांजली द्या इतरांच्या सुखदुःखात सामील व्हावच लागेल तरंच सोनेरी महाला मध्ये तुमचं मन लागेल मृत्यू जवळ दिसल्या नंतर उपयोग काय " नाती " आठवून ? जन्मभर का जगायचं प्रेम आणि अश्रू गोठवून आयुष्य फार छोटं आहे दिवस भुर्रकन उडून जातील Whats app , Face book वरून फक्त " R I P " चे मॅसेज येतील रक्ताच्याच नात्या मधील काही डोळ्यात पाणी असेल तुमच्या लेकरां-बाळा जवळ काका , आत्या , मावशीच असेल मतभेद जरी असतील काही बसून , बोलून संपऊन टाका ताठरपणा सोडून देऊन बहीण , भावाला मारा " हाका " Week end ला मॉल मध्ये Aim less भटकू नका आपलं काही चुकतंय का ? थोडं तपासून तर बघा मनाचं रंजन करण्यासाठी माणूसच लागत असतो संपत्ती कितीही असली तरी " गप्पाची भीक " मागत असतो नशिबाने मिळालेली प्रेमळ नाती तोडू नका आपलं काही चुकतंय का ? थोडं तपासून तर बघा ... 💐💐💐💐💐💐 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments: